जगण्याचा उत्कृष्ट मार्ग (वैज्ञानिक अध्यात्मवाद)

जगण्याचा उत्कृष्ट मार्ग 
(वैज्ञानिक अध्यात्मवाद)

शशांक दत्तात्रय कुलकर्णी हे कृषी, अभियंता, असून सध्या विद्यापीठ अनुदान आयोग्याच्या ज्युनियर रिसर्च फेलो (UGC - JRF ) म्हणून जम्मू केन्द्रीय विश्वविद्यालय जम्मू आणि काश्मीर येथे लोकनीती व लोकप्रकाशन विभागात पी एच डी (phd ) करीत आहे . त्यांच्या वृत्तीत वेड आहे हे लिहण्या-बोलण्याचे. माणसांच्या मानवी मशागत व्हावी, त्यातील अविचारांचे टण निघून जावे आणि जगणाच्या कस वाढावा यासाठी ते नेहमीच मनपूर्वक लिहीत आले आहेत या लेखनाला वाचन, मनन, आणि चिंतनाची जोड लाभलेली आहे. तर्कशुद्ध विवेचन आणि पूर्वग्रह दूषित नसलेली विचारदृष्टी यामुळे थांनी लिहलेले वाचावेसे वाटते . त्यांचे ' जगण्याचा उत्कृष्ट मार्ग : वैज्ञानिक अध्यात्मवाद हे पुस्तक त्यांनी लाभलेल्या उत्तमतेच्या ध्यासातून निर्माण झाले आहे. उत्तप्त्ती आणि विनाश, जन्म आणि मृत्यू या गोष्टी श्रुष्टीतील प्रत्येक घटकाच्या वाट्याला येणाऱ्या आहेत. या दोहोंच्या मधले जगणे अधिक अर्थपूर्ण करण्याची शक्ती माणसाच्या विचारप्रकियेत असते. म्हणूनच विचार बदल जीवन बदलेल असे म्हटले जाते. शशांक दत्तात्रय कुलकर्णी यांनी पुस्तकात केलेली मांडणीही त्याचं दिशेने नेणारी आहे.



Comments

Popular posts from this blog